Tuesday, April 11, 2017

Shree Gajanan Maharaj Bavanni

|| श्री गजानन महाराज बावन्नी ||
                                       
जय जय सद्गुरु गजानन ।
रक्षक तूची भक्तजना ।।१।।

निर्गुण तू परमात्मा तू ।
सगुण रुपात गजानन तू ।।२।।

सदेह तू परि विदेह तू ।
देह असूनि देहातील तू ।।३।।

माघ वद्य सप्तमी दिनी ।
शेगांवात प्रगटोनी ।।४।।
 
उष्ट्या पञावळी निमित्त ।
विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।

बंकटलालावरी तुझी ।
कृपा जाहली ती साची ।।६।।
     
गोसाव्याच्या नवसासाठी ।
गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।
       
तव पदतीर्थे वाचविला ।
जानराव तो भक्तभला ।।८।।

जानकीराम चिंचवणे ।
नासवुनी स्वरुपी आणणे ।।९।।

मुकिन चंदुचे कानवले ।
खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।।

विहिरामाजी जलविहिना ।
केले देवा जलभरना ।।११।।

मद्य माश्यांचे डंख तुवा ।
सहन सुखे केले देवा ।।१२।।
 
त्यांचे काटे योगबले ।
काढुनि सहजी दाखविले ।।१३।।

 कुश्ती हरिशी खेळोनी ।
शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।।
     
वेद म्हणूनी दाखविला ।
चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।
 
जळत्या पर्यकावरती ।
ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा ।
अश्र्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा ।
समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।

रामदासरुपे त्याला ।
दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।
 
सुकलालाची गोमाता ।
व्दाड बहू होती ताता ।।२०।।
 
कृपा तुझी होतांच क्षणी ।
शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लश्मन शेगांवी ।
येता व्याधी तूं निरवी ।।२२।।
 
दांभिकता परि ती त्याची ।
तू न चालवूनी घे साची ।।२३।।
   
भास्कर पाटील तव भक्त ।
उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।।

आध्न्या तव शिरसा वंद्य ।
काकहि मानति तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रक्षीयला ।
देवां तू गणु जवर्याला ।।२६।।

 पितांबराकरवी लीला ।
 वठला आंबा पल्लविला ।।२७।।
 
सुबुध्दी देशी जोश्याला ।
माफ करी तो दंडाला ।।२८।।
 
सवडद येथील गंगाभारती ।
थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।।

 पुंडलिकाचे गंडातर ।
 निष्ठा जाणुनि केले दूर ।।३०।।
 
ओंकारेश्र्वरी फुटली नौका ।
तारी नर्मदा शणात एका ।।३१।।
   
माधवनाथा समवेत ।
केले भोजन अदृष्य ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना ।
प्रसाद तूंची पाठविला ।।३३।।

 कवर सुताची कांदा भाकर ।
 भक्शीलीस प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत ।
लिला  दाविली विपरीत ।।३५।।
 
बायजे चिती तव भक्ती ।
पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।।
 
 बापुना मनी विठ्ठल भक्ती |
 स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

 कवठ्याचा त्या वारकर्याला ।
 मरीपासूनी वाचविला ।।३८।।

 वासुदेव यति तुज भेटे ।
 प्रेमाची ती खुण पटे ।।३९।।

उध्दट झाला हवालदार ।
भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।
 
देहांताच्या नंतरही ।
कितीजना अनुभव येई ।।४१।।

पडत्या मजुरा झेलियले ।
बघती जन आश्चर्य भले ।।४२।।

आंगावरती खांब पडे ।
स्ञी वांचे आश्चर्य घडे ।।४३।।

गजाननाच्या अदभुत लीला ।
अनुभव येती आज मितीला ।।४४।।
शरण जाऊनी गजानना ।
दुःख तयाते करि कथना ।।४५।।

कृपा करी तो भक्तांसी |
धावुन येतो वेगासी।।४६।।
 
गजाननाची बावन्नी ।
नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।
   
बावन्न गुरुवारी नेमे ।
करा पाठ बहूं भक्तीने ।।४८।।

 विघ्ने सारी पडती दूर ।
सर्व सुखांचा येई पुर ।।४९।।

चिंता सार्या दूर करी ।
संकटातुनी पार करी ।।५०।।

सदाचार रत सदभक्ता ।
फळ लाभे बघता बघता ।।५१।।
   
भक्त गण बोले जय बोला ।
गजाननाची जय बोला ।।५२।।  

जय बोला  हो जय बोला । गजाननाची जय बोला।।
                           
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ।।              

।। गण गण गणात बोतेे ।।

75 comments:

  1. Best site
    May god bless the maker

    ReplyDelete
  2. जय श्री गजानन 🙏

    ReplyDelete
  3. Tried to search on various urls but not succeed to get this copy.
    Nice work, god bless all!!!

    ReplyDelete
  4. खूप सुंदर, गण गण गणात बोते, जय श्रीराम

    ReplyDelete
  5. श्री गजानन महाराज की जय

    ReplyDelete
  6. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.

    ReplyDelete
  7. Made very easy for us to chant bawanni,jai ho,jai Gajanan,Shree Gajanan.

    ReplyDelete
  8. Superb .. Very easy to read
    Gajanan maharaj ki jay

    ReplyDelete
  9. Superb .. Very easy to read
    Gajanan maharaj ki jay

    ReplyDelete
  10. बेस्ट लय आवडले

    ReplyDelete
  11. Gajanana krupa kara.Tumcha ashirvad sadaywa aamchya pathishee asava

    ReplyDelete
  12. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  13. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  14. जय श्री गजानन माऊली

    ReplyDelete
  15. Jai Gajanan Shree Gajanan...'GANA GANA GANAT BOTE'

    ReplyDelete
  16. जय गजानन श्री गजानन�� गण गण गणात बोते��

    ReplyDelete
  17. Easily available anywhere (paperless)...
    Great job sir.... Thanks🙏

    ReplyDelete
  18. जय गजानन माऊली

    ReplyDelete
  19. 🌹🌹🌹🌹Gan gan ganat bote🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  20. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  21. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  22. Jai Shri Gajanan Mauli! 🙏

    ReplyDelete
  23. Gan gan ganaat boo tee

    ReplyDelete
  24. ।।सदगुरु श्रीगजानन महाराज की जय।।

    ReplyDelete
  25. रंगग्जर्डवहहफकबजयर्फ

    ReplyDelete
  26. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  27. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  28. गण गण गणांत बोते जय गजानन श्री गजानन

    ReplyDelete
  29. गण गण गणांत बोते जय गजानन श्री गजानन

    ReplyDelete
  30. Replies
    1. गण गण गणांत बोते जय गजानन श्री गजानन

      Delete
    2. गण गण गणात बोते🙏🏻🙏🏻 जय श्री गजानन माऊली🙏🏻🙏🏻

      Delete
  31. जय श्री गजानन माऊली

    ReplyDelete
  32. Gan Gan Ganat Bote.....Jai Shree Maharaj Gajanan.....Shegaon

    ReplyDelete
  33. जय गजानन माऊली

    ReplyDelete
  34. Gajanan Maharaj ki Jay 💐💐💐🙏🙏🙏🎁

    ReplyDelete
  35. गजानन महाराज की जय


    ReplyDelete
  36. अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सतगुरू श्रीसंत गजानन महाराज की जय$$$ जय गजानन श्री गजानन

    ReplyDelete
  37. ओम गजानन नमो नम: श्री गजानन नमो नम:
    जय गजानन नमो नम: गुरु गजानन नमो नम:

    ReplyDelete
  38. जय गजानन🌺🙏🏼

    ReplyDelete
  39. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  40. गण गण गणात बोते..

    ReplyDelete
  41. गण गण गणात बोते

    ReplyDelete
  42. जय गजानन महाराज की जय

    ReplyDelete
  43. Gan Gan Ganat bote 🙏🌹♥️

    ReplyDelete
  44. खुप छान आभारी आहे जय गजानन महाराज की जय

    ReplyDelete
  45. जय गजानन श्री गजानन नमो नमः

    ReplyDelete